जैन धर्म
जैन धर्म एक प्राचिन धर्म जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री रिषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरूप व वैदिक परंपरेसारखा प्राचीन आहे. हा धर्म वैदिक परंपरेतून उदयाला आलेला असून तो एक स्वतंत्र धर्म मानला जातो. अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे. या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. 'जगा आणि जगू द्या' या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करतो. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादामधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केले. ते जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचे काम त्यांच्या काळामध्ये झाले. जैन धर्माला काही...