भारतीय इतिहासात शिल्पकलेतील मानबिंदू ठरलेली मौर्य शिल्पकला….!
भारतीय इतिहासात शिल्पकलेतील मानबिंदू ठरलेली मौर्य शिल्पकला….!
***********************************
सूरज रतन जगताप www.ambedkaree.com
भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात मानबिंदू ठरते ती म्हणजे “मौर्य काळातील” शिल्पकला. मौर्य काळात “प्रस्तर” हे माध्यम वापरुन तयार करण्यात आलेल्या लेण्या व स्तंभ हे आश्चर्यचकित करून टाकणारे आहेत.
सतराव्या शतकात आलेल्या प्रवाशांनी तर हे मानव निर्मित नसून एखाद्या “जीन” ने निर्माण केले आहे असा उल्लेख आपल्या प्रवास वर्णनात करून ठेवलेला आहे.तर अनेक इंग्रज अधिकार्यांना चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी तयार केलेले पिवळ्या “बलूवा” दगडाचे आज्ञा स्तंभ हे धातूचे असावेत असे वाटत होते.
चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी तयार केलेले स्तंभ हे धातू सारखे आजही चमकतात त्याचे कारण आहे की या #बलूवा दगडात तयार केलेल्या स्तंभाला झिलाई आणण्यासाठी दुसर्या एका दगडाने घासून घासून गुळगुळीत केले जाई व झिलाई आणली जाई त्या दगडाचे नाव होते “अगेट”.भारतीय शिल्पकलेतील हे वैशिष्ट्य जगात अन्यत्र आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही.
मौर्य काळा नंतर तीन प्रमुख शिल्प शैली विकसित झाल्या १) गांधार शैली २) मथुरा शैली आणि ३) अमरावती शैली.
ज्या भागात या शैली विकसित झाल्या उदयास आल्या त्या भागाच्या विभागाच्या नावाने त्यांची ओळख निर्माण झाली.जसे गांधार म्हणजे वर्तमान काळातील “कंधार”.या भागात ही शैली विकसित झाली म्हणून तिचे नाव “गांधार शैली” तसे मथुरा या भागत ही शैली विकसित झाली म्हणून “मथुरा शैली” तसेच अमरावती इथे ही शैली विकसित झाली म्हणून “अमरावती शैली”. तिन्ही शैलीत जर पहिली मूर्ती कुणाची तयार केली गेली होती तर ते होते तथागत गौतम बुद्ध.
आजपर्यंत बुद्धांच्या आधी कोणाचीही मूर्ती उत्खननातून सापडलेली नाही.
आता आपण या शिल्प शैली त्यांचे माध्यम आणि राजाश्रय देणारे कोण होते या बाबतीत जाणून घेऊ.
♨️मौर्य कुळातील “सम्राट बृहद्रत” यांची हत्या करणारा त्यांचा सेनापती “शुंग” हा राज्य बळकावतो आणि राज गादीवर बसतो.मौर्य घराणे जोपर्यंत सत्ताधारी होते तोपर्यंत बाह्य आक्रमणे झालेली नव्हती , शुंग राजसत्तेत आल्या नंतर अनेक बाह्य आक्रमणांना सुरुवात होऊ लागली होती व जे स्थानिक घराणी होती त्यांनी शुंगांचे नेतृत्व नाकारले होते, आणि स्वतःला स्वतंत्र राजे घोषित केले होते.
१) “गांधार शैली”( वर्तमान काळातील “कंधार” )-
♨️इ स पहिल्या शतकात कुषाणांनी
👉त्या आधी मानवीय स्वरूपात बुध्दांचे प्रकटीकरण करण्यात आलेले नव्हते
♨️धम्म चक्र ( ज्याला आपण अशोक चक्र म्हणतो )
२) “मथुरा शैली”-
👉इथल्या मातीत जन्माला आलेल्या कलाकारांनी तयार करून घेतलेली बुध्दांची मथुरा शैलीतील मूर्ती आपल्या आजही वस्तू संग्रहालयात पाहायला मिळते,
३)”अमरावती शैली”-
♨️चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे मांडलिक असणारे “सातवाहन घराणे”
जगातील इतर देशात शिल्पकलेला इ स पुर्व पाचव्या शतकापासूनच सुरुवात झाली होती. आपल्या देशाला शिल्पकला ज्ञात झाली ती चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या मुळेच…. !
सूरज रतन जगताप -मुक्त लेणी अभ्यासक ,घणसोली,नवी मुंबई -९३२०२१३४१४








Comments
Post a Comment