मौर्य साम्राज्य

मौर्य साम्राज्य

    दिनांक  13-Feb-2018 

 

 
 
 
 
दुर्दम्य आशावाद, अभूतपूर्व पराक्रम, कुशलराजनीतीच्या बळावर जवळपास संपूर्णभारतावर शासन करणार्‍या मौर्य साम्राज्यानेभारताला केवळ पराक्रमाचा इतिहासचदाखवला नाही तर प्रेम आणि करूणेने सर्वजगाला कसे जिंकता येते याचे प्रत्यक्षउदाहरण घालून दिले. हा मौर्य साम्राज्य आणित्याच्या पराक्रमी सम्राटांचा संक्षिप्त पण सुवर्णइतिहास.
 
 

महाभारत युद्धानंतरचे चौथे साम्राज्य म्हणजे मौर्यअर्थात मगध साम्राज्य होते. चंद्रगुप्त मौर्य हा यासाम्राज्याचा संस्थापक होता. भारताच्याइतिहासातले सर्वात मोठे साम्राज्य असा मौर्यसाम्राज्याचा लौकिक आहे. इ.स. पूर्व ३२१ ते इ.स.पूर्व १८५ पर्यंत यांचे शासन होते. त्यावेळी मगधसाम्राज्यावर नंद वंशाचे शासन होते. बलाढ्य असेहे साम्राज्य त्याच्या शेजारील राज्यांच्या डोळ्यातमात्र सलत होते.जगज्जेता सिकंदर जेव्हापंजाबवर चढाई करत होता तेव्हा आर्य चाणक्यांनीमगधसम्राट धनानंद याला सावध करण्याचा प्रयत्नकेला. मात्र सत्तेचा माज चढलेल्या धनानंदानेत्यांचा अपमान केला. त्याचवेळी चाणक्यनेमगधसम्राटाला धडा शिकविण्याचा तसेच मगधसाम्राज्याला योग्य शासक मिळवून देण्याचा पणकेला आणि तिथून सुरू झाला मगध सम्राटाचाशोध.

 
 
भारत त्यावेळी विविध गणांमध्ये विभागला गेलाहोता. त्यात शाक्य, मौर्य या जातीच्या शासकांचाप्रभाव असे. चंद्रगुप्त हा त्यातल्याच एकागणप्रमुखाचा मुलगा होता. एखाद्या योद्ध्यालाशोभतील असे सारे गुण त्याच्यात होते. तो साहसी,पराक्रमी तर होताच पण चांगले नेतृत्वही तो करतअसे. त्याचे हे गुण चाणक्याने हेरले आणि त्यालाआपले शिष्य बनवले. चाणक्य अर्थशास्त्र,राजकारण, कूटनीती यात निपुण होतेच पणचंद्रगुप्ताला युद्धनीती शिकवून त्यांनी स्वतंत्र सैन्यतयार केले आणि बघता बघता नंद वंशाचा शेवटचासम्राट धनानंद याची सत्ता संपुष्टात आणली.यानंतर चंद्रगुप्त मौर्य मगध सम्राट झाला आणिआर्य चाणक्य त्याचे मुख्यमंत्री झाले. चंद्रगुप्त मौर्ययाने इ.स.पूर्व ३२२ मध्ये या साम्राज्याची स्थापनाकेली आणि पश्चिमेकडे आपल्या साम्राज्याचावेगाने विस्तार केला. सिकंदरच्या आक्रमणानंतरछोट्या-छोट्या राज्यांमध्ये झालेल्या मतभेदांचाफायदा उठवत ते प्रदेश चंद्रगुप्ताने हस्तगत करूनआपले साम्राज्य वाढवले. इ.स. पूर्व ३१६ पर्यंतमौर्य वंशाने पूर्ण उत्तर-पश्चिमभारत आपल्याअंमलाखाली आणला.
 
 
मौर्य वंशाचा चक्रवर्ती सम्राट अशोक याच्याकारकिर्दीत मौर्य वंशाचा प्रचंड विस्तार झाला. मात्रयुद्ध आणि त्यातील रक्तपात यातील फोलपणासमजल्यानंतर अशोकाने बुद्धाचा शांतीचा मार्गअनुसरला. केवळ बौद्धधर्माची दीक्षा घेऊन तोथांबला नाही तर त्याने आपला मुलगा महेंद्र आणिमुलगी संघमित्रा हिला श्रीलंकेला बौद्ध धर्माच्याप्रसारासाठी पाठवले. तेथील राजा तिसा यानेहीबौद्ध धर्माचा स्वीकार केला. पश्चिम आशिया, ग्रीस,नैऋत्य आशिया येथेही सम्राट अशोकाने आपलेअनेक धर्मप्रसारक पाठवले. मौर्य वंशाच्यामहत्त्वपूर्ण शासकांमध्ये चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसारआणि सम्राट अशोक यांचा समावेश होतो. चंद्रगुप्तमौर्याने तामिळनाडू आणि वर्तमानकाळातीलओडिशा हे भाग वगळता भारतातील सर्वमहाद्वीपांवर शासन केले. चंद्रगुप्ताने सिकंदरचाशक्तीशाली शासक सेल्युकस निकेटरला पराभूतकरून त्यानंतरच्या तहानुसार त्याची मुलगीहेलनाशी विवाह केला. त्यामागे सशक्त साम्राज्यनिर्माण करणे आणि त्याच्या साम्राज्याशी मैत्रीपूर्णसंबंध ठेवणे हा हेतू होता. त्यामुळे भारतीयांनापश्चिमी देशांबरोबर व्यापार करणे सोपे झाले.
 
 
 
भारताला एकसंध केल्यानंतर चंद्रगुप्त आणिचाणक्य यांनी सामाजिक आणि आर्थिक बदलघडवले. त्यामुळे संपन्नता तर आलीच पणपाश्चिमात्त्य व्यापारामुळे देशाचा आंतरिक आणिबाह्य विकास साध्य झाला. मौर्य साम्राज्य ४ प्रांतातविभागलेले होते. अशोकाच्या शिलालेखानुसार याचार प्रांतांची नावे तोसली (पूर्व), उज्जैन (पश्चिम),सुवर्णनगरी (दक्षिण), तक्षशिला (उत्तर) अशीहोती. या प्रांतीय प्रशासनाचा प्रमुख राजपुत्र असे.तो राजाचा प्रतिनिधी म्हणून प्रांताचा कारभारपाहत असे. त्याला सहाय्यक म्हणून महाअमात्य वमंत्र्यांची समिती असे. अशीच शासनव्यवस्थासाम्राज्याच्या स्तरावर असे. केवळ प्रशासनाचाप्रमुख हा सम्राट तर त्याला साहाय्य करण्यासाठीमंत्रिपरिषद असे. मौर्य साम्राज्याचे सैन्य त्याकाळचेसर्वाधिक सैन्य होते. ६ लाख पायदळ, ३० हजार घोडदळ व ९ हजार लढाऊ हत्ती या सैन्यात होते.त्याचप्रमाणे अंतर्गत व बाह्य माहिती गोळा करणारेहेरगिरी खातेही तैनात होते. सम्राट अशोकानेत्याच्या कालखंडात युद्ध व साम्राज्यविस्तारासआळा घातला असला तरी अंतर्गत व बाह्यशांततेसाठी आपले सैन्य कायमठेवले होते.चंद्रगुप्ताने भव्य इराणी शहरांशी स्पर्धा करेल,अशी ६४ दरवाजे व ५०० मनोरे असलेली मोठीलाकडी भिंत आपली राजधानी पाटलीपुत्रभोवतीबांधली होती. मौर्य साम्राज्याच्या एकछत्रीअंमलामुळे अंतर्गत लढायांना आळा बसला वप्रथमच संपूर्ण भारताची एकत्र आर्थिक व्यवस्थानिर्माण झाली. वेगवेगळे कर भरण्याऐवजी‘अर्थशास्त्र’ या चाणक्यच्या ग्रंथातील तत्त्वांवरआधारित शिस्तबद्ध व उचित अशी कर आकारणीशासनाद्वारे सुरू झाली. मौर्यकालीन अर्थव्यवस्थाही त्यानंतर अनेक शतकांनी उदयास आलेल्यारोमन साम्राज्यासारखी होती. दोन्ही साम्राज्यांचेमोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध होते. सहकारीसंस्थेसारख्या संस्था होत्या. चंद्रगुप्ताने संपूर्णभारतात एकच चलन प्रस्थापित केले.शेतकर्‍यांना, व्यापार्‍यांना न्याय तसेच सुरक्षामिळावी याकरिता प्रांतस्तरावर प्रशासक नेमले.गुन्हेगारी टोळ्या, खाजगी, प्रांतिक सैन्य यांना डोकेवर काढू दिले नाही. त्यांच्यावर ताबा मिळवला.परिणामी अंतर्गत व्यापार, राजकीय एकात्मता,अंतर्गत सुरक्षा वाढीस लागली. आंतरराष्ट्रीयव्यापारही मौर्य शासनकाळात चमसीमेवर होते.सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमेवरीलखैबरखिंड ही या व्यापारात अतिशय महत्त्वाचीहोती. पश्चिम आशियातील ग्रीक राज्ये, मलयद्वीपकल्प भारताबरोबर मोठ्या प्रमाणात व्यापारकरीत. भारतातून रेशीम, रेशमी कापड, कपडे,मसाले व विविध खाद्यपदार्थ निर्यात होई.युरोपबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचीदेवाणघेवाण झाल्याने साम्राज्य समृद्ध झाले.मौर्यसम्राट अशोकाच्या कारकिर्दीत हजारो रस्ते,कालवे, जलमार्ग, दवाखाने, धर्मशाळा निर्माणझाले. धान्य व कर गोळा करण्यासंबंधीच्या अनेककठोर कायद्यांच्या शिथिलीकरणाने साम्राज्याचीउत्पादनक्षमता वाढली. मौर्यकाळात आरंभी हिंदूधर्म प्रमुख धर्म होता. चंद्रगुप्त मौर्य यानेहीआपल्या अखेरच्या काळात जैन धर्म स्वीकारलाहोता.
 
 
श्रवणबेळगोळ येथे सापडलेल्या शिलालेखानुसारचंद्रगुप्त आपल्या अंतिमटप्प्यात जैन मुनी बनलेहोते. ते शेवटचे मुकुटधारी जैन मुनी होते.त्यांच्यानंतर कोणीही मुकुटधारी म्हणजे प्रशासकअसलेले जैन मुनी झाले नाही. जैन धर्मातचंद्रगुप्ताला विशेष महत्त्व आहे. चंद्रगुप्त स्वामीभद्रबाहू यांच्यासमवेत श्रवणबेळगोळ येथे गेलाहोता. तेथेच अन्नपाणी वर्ज्य करून,समाधीअवस्थेत त्याने आपले प्राण सोडले.श्रवणबेळगोळ येथे ज्या पर्वतावर त्याचे वास्तव्यहोते त्या पर्वताला ‘चंद्रगिरि’ असे नाव पडले आणितेथेच त्याने बनविलेले ‘चंद्रगुप्तबस्ति’ नावाचेमंदिरही आहे. सम्राट अशोकाचे ४० अभिलेखआतापर्यंत अवगत झाले आहेत. जे प्रामुख्यानेब्राह्मी लिपीत, खरोष्टी आणि ग्रीक भाषेत लिहिलेगेले आहेत. सम्राट अशोकाचा बराचसा इतिहासया अभिलेखांतून प्रतीत होतो. इराणचा शासकडेरियस याच्याकडून प्रेरणा घेऊन अशोकाने हेअभिलेख तयार केल्याचे मानले जाते. सम्राटअशोकाने भगवान बुद्धाच्या मानवतावादी संदेशानेप्रभावत होऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला वत्याचा जगभर प्रसार केला. त्याच्या काळात बौद्धधर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता. अशोकानेआपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांनाश्रीलंकेत पाठवून तेथे बौद्ध धर्माचा प्रसार केला.तिसा या तेथील राजानेही बौद्ध धर्माचा स्वीकारकेला. पश्चिम आशिया, ग्रीस, आग्नेय आशियायेथेही अशोकाने आपले अनेक धर्मप्रसारकपाठवले. त्याने बुद्धाच्या स्मरणार्थ अनेक स्तंभबांधले, जे आजही त्यांच्या जन्मस्थळीनेपाळमधील लुम्बिनीत मायादेवी मंदिराजवळ,सारनाथ, बोधगया, कुशीनगर तसेच श्रीलंका,थायलंड, चीन या देशांत ‘अशोकस्तंभ’ यास्वरूपात पाहायला मिळतात. सम्राट अशोकआपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकही युद्ध हरलानाही. इतका यशस्वी सम्राट असूनही युद्धाने,त्यामधील रक्तपाताने होणारी मनुष्यहानी बघूनत्याचे मन हेलावले आणि शांतीचा, करुणेचा संदेशदेणारा बौद्ध धर्म त्याला जवळचा वाटला.माणसाला युद्धाने नव्हे तर प्रेमाने जिंकता येते, हेत्याला समजले आणि त्याने बौद्ध धर्म केवळस्वीकारलाच नाही तर जगभर त्याचे अनुयायीघडवले. अशोकानंतर ५० वर्षे केवळ दुर्बल राजांनीमौर्य साम्राज्य चालवले. बृहद्रथ हा या साम्राज्याचाशेवटचा राजा होता. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, सम्राटअशोक यांनी प्रचंड पराक्रमआणि शिस्तबद्ध रितीनेआपल्या साम्राज्याचा जेवढ्या झपाट्याने विस्तारकेला, जवळपास संपूर्ण भारत पादाक्रांत केला,त्याच मौर्य साम्राज्याचा निम्म्याहूनही कमी भागबृहद्रथाच्या साम्राज्यात होता. आपले सर्व साम्राज्यया दुर्बल राजांनी गमावले होते. बृहद्रथाची हत्याइ.स. पूर्व १८५ मध्ये लष्करी संचलनादरम्यानत्याचा मुख्य सेनापती असलेल्या पुष्यमित्र शुंगयाने केली. त्याने मौर्य साम्राज्याच्या जागी ‘शुंग’साम्राज्य स्थापित केले. अशाप्रकारे चाणक्याचीचाणाक्ष बुद्धी आणि चातुर्य, चंद्रगुप्ताचे अतुलनीयसाहस यांच्या अभूतपूर्व संयोगाने निर्माण झालेले,सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारानेनावलौकीक मिळवून दिलेले मौर्य साम्राज्य दुर्बलप्रशासकांमुळे अस्तंगत झाले.

रश्मी मर्चंडे


Comments

Popular posts from this blog

बुद्ध और शंकर

आजीवक संप्रदाय

12 Tallest Statues of Jain Tirthankara in India