बौद्ध संस्कृतीचा शब्द ‘पल्ली’
बौद्ध संस्कृतीचा शब्द ‘पल्ली’
‘Palli’ word related to Buddhism.
-संजय सावंत,नवी मुंबई
-www.ambedkaree.com
‘पल्ली’ म्हटल्यावर हा एक दक्षिण भारतीय शब्द आहे हे लक्षात येते आणि ते बरोबरच आहे. पण हाच शब्द आशिया आणि इतर खंडात सुद्धा पहायला व ऐकायला मिळतो याचे आश्चर्य वाटते. अशा या ‘पल्ली’ शब्दाचा उगम शोधला तर तो बौद्ध संस्कृतीतून आल्याचे स्पष्ट होते.
नऊशे वर्षापूर्वी दक्षिण भारतात बौद्ध संस्कृती व बुद्धांची शिकवण जोपासणारी अनेक केंद्रे चालू होती. ही केंद्रे तेथील स्तूपाच्या व विहाराच्या आसपास होती. व ही केंद्रे बौद्ध भिक्खूं चालवीत असत. तेव्हा पासून केरळातील
♨️शैक्षणिक केंद्रांना ‘पल्ली’ हे नामनिधान मिळाले.
पुढे कालांतराने त्याला ‘पल्लिकोडम’ असे सुद्धा म्हणू लागले. ‘पल्ली’ हा आदर व्यक्त करणारा शब्द आहे.
♨️मल्याळम् भाषेत शाळेला ‘पल्लिकोडम’ म्हणतात.
♨️सिरिलंकेतील तामिळ लोकसुद्धा शाळेला पल्लिकोडम म्हणतात.
हजारो वर्षांपूर्वी दक्षिण भारतात अनेक विहारांच्या ठिकाणी बौद्ध शैक्षणिक केंद्रे होती. आज ती राहिली नाही तरी ‘पल्ली’ शब्द टिकून राहिला आहे.
♨️स्तूपाच्या ठिकाणी ठेवलेल्या अस्थिवरून ‘पल्ली'(अस्थींचे विश्रांतीस्थळ) या शब्दाचा उगम झाला असावा असे काही संशोधकांनी म्हटले आहे. तसेच
♨️प्राचीनकाळी ‘पाली’ भाषेतून बुद्ध शिकवणुकीचे अध्ययन सर्व ठिकाणी होत असल्याने त्यावरून सुद्धा ‘पल्ली’ शब्द आला असावा असे अनेकांनी शोध निबंधात म्हटले आहे.
👉दक्षिण आशिया खंडात असलेल्या ‘बाली’ बेटाच्या नावाचा उगमही ‘पल्ली’ वरून झालेला आहे.
👉आंध्रप्रदेश राज्यात कोनापल्ली, मोडेपल्ली, चिंनाकोथापल्ली अशी विविध नावांची असंख्य गावे आहेत.
👉तामिळनाडू राज्यात कृष्णगिरी जिल्ह्यात ‘पल्ली’ शब्द असलेल्या गावांचा तर खूप भरणा आहे.
👉लिबिया देशाच्या राजधानीचे नाव देखील त्रिपोली (त्रिरत्न युक्त)आहे.
👉केरळात व तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी ‘पल्ली’ वरून ‘पेरूमल’ झाले आहे.
👉आणि तिथे गेल्या काही वर्षात एवढ्या बुद्धमूर्ती सापडल्या आहेत की मदुराई येथील बुद्धिजीवी वर्गाने ‘तामिळ बुद्धा अराईची पल्ली’ नावाचा प्लॅटफॉर्म/ग्रुप संशोधनासाठी स्थापित केला आहे.
♨️थोडक्यात कुठल्याही स्थानाला जर ‘पल्ली’, ‘वली’, ‘हली’ शब्द जोडलेला आढळून आला तर ते स्थान प्राचीनकाळी बौद्ध संस्कृतीशी निगडित होते व आहे हे पक्के ध्यानात ठेवावे. एकेकाळी बुद्ध नुसता भारतातच नव्हे तर सगळीकडे पसरला होता व आताही पुन्हा जगभर पसरत आहे.
(प्रस्तुत लेखक बौद्ध साहित्य आणि संस्कृती यांचे अभ्यासक आणि विश्लेषक आहेत.)


Comments
Post a Comment