सम्राट अशोक याने बौद्ध धर्म स्वीकारला नसता तर तो किती मोठे साम्राज्य उभे करू शकला असता?
नक्कीच अखंड भारत हा युरोप व संपूर्ण चीन, रशिया पर्यंत साम्राज्य गेले असते. कारण सर्व जग जरी म्हणत असले की जैन धर्म हा "अहिंसा परमो धरम" वर आधारीत असला तरी, कलिंगा युद्ध जिंकेपर्यंत सम्राट अशोक जैन शास्त्रानुसारच वैयक्तिक जीवन जगत होता.
त्या शास्त्राने राजा प्रचंड ज्ञान, संयम, चित्त कमवून होता, टिकवून होता. परिणाम की प्रत्येक छोटे मोठे युद्ध, डावपेच, विवाद जिंकत खूप कमी हानी, नुकसान करत साम्राज्य वाढविले होते.
पण कलिंगा युद्धातील प्रचंड जीवहानी पाहून राजा प्रचंड विचलीत झाला. आणि आपण हे काय करुन बसलो याचा पश्चात्ताप झाला. आपले धर्मज्ञान आपल्याला हे शिकवत नाही, याचे भान ठेवून होता. जैन धर्मातील संज्ञांवर त्याची प्रचंड श्रद्धा होती. आपण जैन राजा आहोत आणि जैन असून सुद्धा इतकी मोठी जिवीतहानी आपल्या आदेशाने होऊ शकते. म्हणजे
जैन धर्माच्या मुल तत्वालाच धक्का लागतोय म्हणल्यावर जैन धर्मासारखीच जवळपास तत्वे असणारा पण थोडा लवचिक असा बौद्ध धर्म राजाने स्विकारला आणि पाठोपाठ कोट्यावधी जनतेही तो धर्म स्विकारला.
सम्राट अशोक हा दुरदृष्टी बाळगणारा महान राजा, पंडीत होता.
त्यानी तसे केले नसते तर लोकही मुळ जैन तत्वापासून भरकटले असते. कारण
जैन असुनसुद्धा जीवहत्या करु शकण्याची मानसिकता रुजली असती, पटली असती. अहिंसा, संयम, त्याग तत्वाने मोक्षमार्ग मिळवण्याचा एका धर्माबद्दलचा समजच बदलला गेला असता.
राजाने वेळीच धर्म बदलला आणि हे सर्व टळले. अन्यथा अखंड भारत हा वाढतच गेला असता. पण दुसर्या बाजूने संयमी धर्माच्या तत्वांबद्दल चुकीचा समज पसरला असता. पण राजा खरोखरीच महान होता.
साम्राज्य विस्तार करण्याबरोबरच लोकांसाठी मोक्षमार्ग सांगणारा धर्म ही सुरक्षित ठेवला.
इतिहास वाचल्यावर हे पण लक्षात येते की
जैन शास्त्राचा योग्य अभ्यास करत ज्यानी ज्यानी राज्य चालवले ते सर्वच राजे यशस्वी होते पण तत्वे भरकटलेले सर्वच राज्यांचे नंतर नुकसान झाले होते.
पण सम्राट अशोक एकदम हटके राजा होता.
ज्या शास्त्रामुळे तो सम्राट पदापर्यंत पोहोचला, त्या शास्त्राची अवहेलना होऊ दिली नाही, त्या शास्त्राबद्दल कोणताही चुकीचा समज होऊ दिला नाही.
स्वतःच धर्मबदल करुन विस्तारलेले साम्राज्य सांभाळले.
बौद्ध धर्म स्विकारल्यावर राजाने परत फार मोठा विस्तार केल्याचे वाचनात नाही. उलट शांतताप्रिय बौद्ध धर्माचा जगभर प्रसार केला. आणि मोक्षमार्गासाठी प्रयत्न करणाऱ्यांना एक सूक्ष्म अध्यात्मिक शास्त्र शाबूत ही ठेवले.
Comments
Post a Comment