आजवर एकूण किती बुद्ध होऊन गेले आहेत? त्यांची नावे आणि काळ कोणता?


बुद्ध म्हणजे असा व्यक्ती ज्याने आत्मज्ञान आणि बुद्धत्व प्राप्त केले आहे, आणि ज्याला चार आर्यसत्यांची पूर्ण समज आहे.

बुद्ध हे व्यक्तीचे नाव अथवा पद नसून ते मनाच्या स्थितीचे किंवा अवस्थेचे नाव आहे. मनाची अशी अवस्था की, जी मानसिक विकासाच्या अत्युच्च शिखरावर पोहचली आहे. बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झाली आहे किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे. पाली भाषेत याला सर्वज्ञ म्हटले आहे.

बौद्ध धर्मात बुद्धत्व म्हणजे एखाद्या जीवाच्या त्या स्थितीला म्हटले जाते ज्यामध्ये तो पूर्ण ज्ञान आणि बोधी मिळवून सम्यक संबुद्ध निर्वाणाच्या मार्गावर मार्गस्त झालेला असतो.

होऊन गेलेल्या २८ आणि भविष्यातील एक अशा २९ बुद्धांची नावे पुढील प्रमाणे :

१. तंहनकर बुद्ध

हे ज्ञात बुद्धांपैकी सर्वात पहिले बुद्ध आहेत, त्यांचा कार्यकाळ सारमंद कल्पात होऊन गेला.

२. मेधांकर बुद्ध

३. शरणांकर बुद्ध

४. दीपंकर बुद्ध

अफगाणिस्तान च्या बामियान मध्ये तालिबानी अतिरेक्यांनी उध्वस्त केलेला पुतळा दीपंकर बुद्धांचा होता.

५. कौंडिण्य बुद्ध

६. मंगल बुद्ध

७. सुमन बुद्ध

८. रेवत बुद्ध

९. शोभित बुद्ध

१०. अनोमदर्शी बुद्ध

११. पद्म बुद्ध

१२. नारद बुद्ध

१३. पद्यमोत्तर बुद्ध

१४. सुमेध बुद्ध

दीपंकर बुद्धांकडून नियती विवरण स्वीकारताना सुमेध बुद्ध.

१५. सुजात बुद्ध

१६. प्रियदर्शी बुद्ध

१७. अर्थदर्शी बुद्ध

१८. धर्मदर्शी बुद्ध

१९. सिद्धार्थ बुद्ध (सध्या ज्ञात असलेले गौतम बुद्ध आणि सिद्धार्थ बुद्ध वेगवेगळे आहेत.)

२०. तिष्य बुद्ध

२१. पुष्य बुद्ध

२२. विपश्य बुद्ध

२३. शिखी बुद्ध

२४. विश्वाभू बुद्ध (व्यूहकल्पातले १००० वे बुद्ध)

२५. काकसंध बुद्ध (भद्रकल्पातले पहिले बुद्ध)

हे भद्रकल्पातील पहिले बुद्ध आहेत

२६. कानकमुनी बुद्ध

२७. कश्यप बुद्ध

२८. गौतम बुद्ध

भद्रकल्पातले चौथे आणि वर्तमान बुद्ध.

२९. मैत्रेय बुद्ध (भविष्यातील बुद्ध).

बौद्ध धर्मात महायान, थेरवाद, वज्रयान, झेन इत्यादी पंथ आहेत. पैकी थेरवाद किंवा स्थविरवाद हा बौद्ध धर्मातील सर्वांत जुना पंथ आहे. वैष्णव सनातन धर्मानुसार जसे सध्याचे युग हे कलियुग म्हणून ओळखले जाते, त्याच प्रमाणे बौद्ध परंपरेनुसार सध्याचे युग हे भद्रकल्प म्हणून ओळखले जाते. बौद्ध मान्यतेनुसार प्रत्येक युगामध्ये एक हजार बुद्ध असतात. भद्रकल्पाच्या अगोदर व्यूहकल्पामधे हजार बुद्ध होऊन गेले.

व्यूहकल्प आणि भद्रकल्प या दोन युगांना जोडणाऱ्या बुद्धांना (विपश्य, शिखी, विश्वाभू, काकसंध, कानकमुनी, कश्यप, गौतम) सप्ततथागत म्हणतात.

सांची येथील खांबावर कोरलेले सप्ततथागत.

आज प्रचलित असलेला बौद्ध धम्म इ.स.पू. ६ व्या शतकातील गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. प्रत्येक बुद्धांच्या शिकवणी काही काळानंतर लोप पावतात. गौतम बुद्ध आणि त्यांच्या अगोदरचे कश्यप बुद्ध यांच्या दरम्यानचा काळ २० सहस्त्र वर्षांचा होता. कश्यप बुद्धाच्या शिकवणी गायब होण्यासाठी हा काळ पुरेसा आहे. म्हणूनच केवळ वर्तमान बुद्धांची शिकवण लोकांच्या लक्षात/अंमलात आहे. अजून हजारो वर्षांनंतर गौतम बुद्धांची शिकवण सुद्धा लोप पावेल आणि भविष्यातील जगाला धम्माचे तत्वज्ञान शिकवण्यासाठी मैत्रेय बुद्धांच्या रूपात नवीन बुद्ध मिळेल.

धन्यवाद !!

संदर्भ :

Comments

Popular posts from this blog

बुद्ध और शंकर

आजीवक संप्रदाय

12 Tallest Statues of Jain Tirthankara in India