देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा..
- Get link
- X
- Other Apps
©2014 By www.buddhistsofindia.blogspot.in You may copy anything else from this Blogspot, But : 1. You should mention the source of an article or text from where you copied it. 2. Don't use any article to make money in any respect . otherwise All Rights resereved
▼
बुधवार, ५ एप्रिल, २०१७
देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा...
देवांच्या प्रिय अशा प्रियदर्शी सम्राट अशोक यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या मंगल स्मृतीस विनम्र अभिवादन. सम्राट अशोक हे महान धर्मसम्राट होते, त्यांच्या जीवन कार्याबद्दल जाणून घेण्याच्या जरासा प्रयत्न जरी केला तरी आपल्याला समजून येईल कि, त्यांच्यासारखा राजा दुसरा कोणी होऊन गेला असेल. पण जगाच्या ह्या महान धर्मसम्राटाच्या कार्याचा आणि त्याने भारतभुमीला प्राप्त करुन दिलेल्या गौरवाचा विसर आपल्याला पडलेला आहे. परंतु उशिरा का होईना पण यावर्षी काही मंडळींनी पुढाकार घेऊन ह्या धर्मराजाची जयंती यावर्षी पासून नियमितपणे साजरी करण्याचा तसेच त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सामान्य जनतेला माहिती व्हावी, त्यासाठी त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा एक सर्वसामान्य विचार सुध्दा अभिनंदनास आणि साधुवादास पात्र आहे..
सम्राट अशोकांच्या जयंतीनिमित्य त्यांनी मार्गदर्शक म्हणुन लिहून ठेवलेल्या अनेक अभिलेखांच्या बाबत थोडक्यात माहिती देण्यासाठी तसेच त्यांच्या नावावर काही अपप्रचार करणाऱ्यांना उत्तर म्हणुन सदर लेख लिहित आहे (काही दिवसांच्या पुर्वी एका वेबसाईटवर एक लेख वाचण्यात आला होता, ज्यामध्ये सम्राट अशोकांच्या बाबतीत असा अपप्रचार करण्यात आला होता कि, त्यांनी आपल्या लेखांमध्ये आपण बौध्द असल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही, एवढेच काय तर त्यांनी बौध्द धर्माचा सुध्दा उल्लेख केलेला नाही. अशाप्रकारे चुकीच्या माहितीच्या आधारे लिहिला गेलेला तो लेख सर्वसामान्य लोकांची दिशाभुल करणारा आहे. याशिवाय जगामध्ये असे अनेक लेखक अस्तित्वात आहेत, ज्यांना कदाचित सत्य माहित असतांना सुध्दा त्यांच्या बाबतीत सामान्य लोकामध्ये गैरसमज पसरविण्यासाठी ते लिखाण करीत असतात, ज्यामध्ये त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना कशाचाही आधार राहत नाही. त्यामुळे अशा लेखांपासुन सावध रहावे. त्यांच्यावर विश्वास न ठेवता त्यात लिहिल्या गेलेल्या मजकुराची योग्य प्रकारे पडताळणी करावी.) आपण याप्रमाणे लेख वाचून यातुन मिळणारा संदेश ग्रहण करावा, जेणेकरून आपल्या जीवन - प्रवासामध्ये याचा उपयोग होऊ शकेल...
आपण सम्राट अशोकांना महान सम्राट म्हणतो,त्याचप्रमाणे जगामध्ये असे इतरही अनेक राजे होऊन गेले आहेत त्यांच्या संबंधी वर्णन करतांना त्यांचे भक्त असे म्हणतात कि, शंभर - दीडशे लढाया जिंकणारा व त्यातील एकही लढाई न घेणारा आमचा राजा पराक्रमी आणि महान आहे. पण वास्तविक पाहता, बाह्य युध्दामध्ये जिंकण्याचा त्याच्या महत्तेशी कसा काय संबंध लावता येईल. बाह्य युध्दात जिंकल्यामुळे तो महान होणार नाही,किंवा हरल्याने तो लहान होणार नाही; फार तर त्याचा संबंध त्याच्या युध्दकलेत असलेल्या नैपुण्यतेशी लावता येईल. कारण भगवान बुध्दांनी म्हटले आहे, युध्दामध्ये सहस्त्र योध्दांना जिंकण्यापेक्षा जो एक स्वतःला जिंकतो,तो खरा युध्दजेता होय... त्यामुळे सम्राट अशोक महान यासाठी ठरतात कि, प्रकृती धर्माचरणाची वाढ व्हावी,यासाठी त्यांनी धर्मयुध्द केले. हे युध्द समाजातील वाईट चालीरीती विरूद्ध होते, अंधश्रध्दा आणि अधर्माविरुध्द होते. या कालखंडात त्यांनी कोणाशी युध्द न करता सुध्दा आपल्या साम्राज्यात धर्मराज्य प्रस्थापित केले, जे दिडशे लढाया जिंकणाऱ्यांसाठी सुध्दा त्याची कणभर बरोबरी साधणे शक्य झाले नाही. तुम्ही युध्द कशासाठी करत आहात..? आपला साम्राज्य विस्तार करण्यासाठी का. ?पण या सर्वांचा तुमच्या प्रजेच्या जीवनात काय फरक पडणार आहे, ते यातुन दुःखमुक्त होतील असे आपल्याला वाटते का..? एक राजा म्हणून तुमच्या प्रजेच्या प्रती तुमची काय कर्तव्ये आहेत किंवा प्रजेला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे...? प्रजा सुखी व्हावी असे तुम्हा वाटते, पण ती सुखी कशी होणार याचा आपण कधी विचार केला आहे का...? केवळ बाह्य आणि ऎहिक गोष्टींचा पुरवठा केल्याने ते सुखी होणार नाहीत, त्यांच्या नित्य सुखासाठी धर्माचाच आधार घ्यावा लागेल. सम्राट अशोकांनी आपल्या जगामध्ये धर्मराज्याची स्थापना करण्यासाठी केलेला त्याग आणि दिलेले दान निःसंशय अतुल्य आहे, ज्याची तुलना करता येणे शक्य नाही.
१. अशोकांचे धर्मांतर
सम्राट अशोकांच्या बाबतीत घडलेला सर्व सामान्य इतिहास आपल्याला माहित आहेच, कि सर्व जग जिंकायला निघालेल्या राजाचे मन एका युध्दात झालेल्या रक्तपाताला पाहून पिळवटते. रक्तपाताचा हा मार्ग सोडून तो धर्माचा मार्ग निवडतो. याविषयावर लिहितांना सम्राट म्हणतात कि,
"देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने आपल्या राज्यभिषेकाच्या आठ वर्षांनंतर कलिंग विजय संपादन केला. ह्या युध्दामध्ये दीड लाख लोकांना बंदी बनवून कारागृहात टाकण्यात आले, एक लाख लोक मारल्या गेले आणि अनेक लोक मृत्यू पावले. कलिंग राष्ट्रावर विजय मिळविल्या नंतर देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाचे धर्म अनुशीलन, धर्माप्रती लालसा आसि धर्मानुशासन तीव्र झाले." कलिंगवर विजय मिळविल्या नंतर देवांच्या प्रिय राजाला पश्चात्ताप झाला. यासाठी त्यांनी धर्माचा स्वीकार केला हे स्पष्टपणे आपल्याला या लेखावरुन समजते. त्यामुळे याविषयावर टिका करणाऱ्या लोकांनी वास्तवतेचे भान ठेवून पुढील लेख लिहावेत.
२. धर्मयात्रा
भगवान बुध्दांनी महापरिनिब्बाण सुत्तामध्ये आपल्याला धर्मयात्रा करण्याचा उपदेश केला आहे, बुध्द, धम्म आणि संघाच्या प्रती श्रध्दा असणाऱ्या प्रत्येक जीवाने ती धर्मयात्रा अवश्य करावी यासाठी सम्राट अशोकांनीच आपल्या पुढे एक आदर्श प्रस्थापित केला अाहे.
अ) बोधीवृक्षाची यात्रा : पूर्वीच्या काळी राजे महाराजे लोक केवळ शिकारीला जाण्यासाठीच राजवाड्यातून बाहेर पडत असत, तीच त्यांची एकमेव यात्रा राहत असे. पण सम्राट अशोकांनी या प्रथेच्या विरुध्द जात, अशाप्रकारच्या अधर्मी यात्रांचा त्याग केला जिथे जनावरांची हत्या होते. तर नव्या धर्मायात्रेची सुरुवात त्यांनी केली. अशा यात्रेची सुरुवात बोधीसत्वाला ज्या वृक्षाखाली बसून सम्यक संबोधीची प्राप्ती झाली बोधीवृक्षापासूनच केली. आपल्या धर्मलेखामध्ये ते म्हणतात,
यावरून आपल्याला समजते कि सम्राट प्रियदर्शी अशोक यांना शिकारीला जाण्यासारख्या विहार यात्रांमध्ये जराही रस नव्हता, तर धर्मयात्रा करण्यात त्यांना आनंद मिळायचा. पण येथे हे लक्षात घ्यावे कि, धर्मयात्रा म्हणजे तीर्थ जत्रा वगैरे किंवा नव्हती ज्यांचे विकृत स्वरूप आपल्याला बघायला मिळतात, तर ती एक धर्मयात्रा होती. जिथे लोक धर्म शिकायला, धर्माच्या बाबतीत कोणत्या शंका असतील तर त्या दुर करायला, आपले धार्मिक अनुभव एकमेकांशी वाटायला जात होते.
त्याचप्रमाणे "आपल्या राज्यभिषेकाच्या २० वर्षांनंतर देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने ह्या भुमीला भेट देऊन त्याची पूजा केली, जिथे शाक्यमुनी बुध्दांचा जन्म झाला होता. त्यांनी त्या ठिकाणी एक शिलालेख लिहिला तसेच एक स्तंभ उभारला आणि या ठिकाणी भगवानांचा जन्म झाला असल्याने मुख्य करातुन मुक्त करीत केवळ त्याचा आठवा भाग जमा करण्याचा आदेश दिला.."
३. धर्मप्रचार
४. धर्म म्हणजे काय..?
आतापर्यंत आपण बघितले आहे की, सम्राट अशोकांनी धर्मप्रसारासाठी आपल्या मुला मुलींना संघाला दान दिले तर सृष्टीच्या अंतापर्यत आपल्या पाैत्र - प्रपाैत्रांना कार्य करित राहण्याची आज्ञा दिली. धर्मप्रसारासाठी विविध अधिकार्यांच्या नेमणुका केल्या. पण यामध्ये काय विशेष...? अशाप्रकारचा प्रशन काही लोकांना पडणे सहाजिकच आहे. काही लोक म्हणतील कि, धर्म प्रसारासाठी किंवा रक्षणासाठी आमच्या अमुक महाराजांनी विविध कार्यक्रम राबविले दुसऱ्या संप्रदायाच्या लोकांना कापून काढले, इत्यादी. मग यातुन सम्राट अशोक कसे काय वेगळे ठरतात..? याचे उत्तर आपल्याला पुढील लेखातुन सापडते, "देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणतो कि, धर्म हा उत्तम आहे, पण धर्म म्हणजे काय..? धर्म म्हणजे पापांपासुन दुर रहावे, पुष्कळ चांगली कृत्ये करावीत. दान, दया, सुत्त व पावित्य यांचे पालन करावे. मी अनेक प्रकारे चक्षूदान केले आहे. द्विपाद, चतुष्पाद, पक्षी व जलचर प्राण्यांवर मी अनेक प्रकारे कृपा केली आहे. इतकी कि, मी त्यांना प्राणदान सुध्दा दिले आहे. अजूनही चांगली कामे मी केलेली अाहेत. हा लेख अशासाठी लिहिविला गेला आगे कि, लोकांनी ह्या उदाहरणा प्रमाणे वागावे व चिरकाल रहावे, याप्रमाणे वागेल तो पुण्यकृत्य करील"
अगदी भगवान बुध्दांनी धम्मपदामध्ये उपदेश केलेल्या धम्माच्या साराप्रमाणे, सर्व प्रकारचे पाप न करणे, कुशल कर्मांचे संपादन करणे, स्वचित्ताची शुध्दी करणे, हेच बुध्दांचे शासन आहे. अर्थात धर्म म्हणजेच बुध्दांची शिकवण व धर्मराज्य म्हणजेच बुध्दांचे शासन. अशा ह्या बुध्दांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी आपके अायुष्य वाहून घेतले. लोकांमध्ये बुध्दांच्या शिकवणी नुसार आचरण करण्याची अर्थात धर्माचरणाची वृद्धी व्हावी जेणे करुन सर्व जीव सुखी व्हावेत ह्या मंगळ कामनेने विविध प्रकारच्या संप्रदायातील लोकांमध्ये धर्मप्रचार करण्याचे कार्य केले. अर्थात विविध प्रकारची कर्मकांड करुन त्यांना बळजबरीने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यांचे धर्मांतर करुन केवळ नावाचे बाैध्द बनविले नाही. तर त्यांच्या शिकवणीला त्यांच्यात प्रस्थापित करून, त्यांच्या आचरणातुन शिकवण प्रदर्शित करुन सम्राट अशोकांनी धर्मराज्याची प्रस्थापना केली.
५. धर्मराज्यात सर्व समान आहेत...
अशा ह्या धम्मराज्यामध्ये कसल्याही आणि कोणत्याही प्रकारचा भेद नव्हता. त्या धम्मराज्यामध्ये सर्व जगाच्या हितासाठी आणि सुखासाठी महाकारुणिक भगवान बुध्दांनी उपदेश केलेल्या धर्माची प्रस्थापना झाली होती.,त्यांचे राज्य हे धर्मराज्य बनले होते. धर्मराज्य म्हणजे अशाप्रकारचे राज्य जिथे कोणीही कोणाची वंचना करीत नाहीत, कोणीही कोणाचा अपमान करित नाहीत, सर्व जीव एकमेकांच्या कल्याणाचीच कामना करित असतात. त्यांच्या राज्यामध्ये जातीभेद, अंधश्रध्दा, निरूपयोगी कर्मकांड किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नव्हता. त्याला समजण्यासाठी खालील धर्मलेखाची मदत होईल, "देवांचा प्रिय प्रियदर्शी राजाची अशी इच्छा आहे कि, सर्व संप्रदायाच्या लोकांनी त्याच्या साम्राज्यात सर्वत्र रहावे. कारण ते त्यांच्यासाठी संयम व भावशुध्दी यांची इच्छा करतात."
यावरून आपल्याला समजते कि, इतर संप्रदायातील लोकांच्या प्रती सुध्दा त्यांना आपल्या मुला - बाळाप्रमाणेच काळजी होती. त्यांच्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचा भेद करत नव्हते. तर सर्व संप्रदायातील लोकांनी एकमेकांच्या संप्रदाय आणि शिकवणीचा आदर करित त्यांच्यातून जे काही चांगले आहे, ते स्वीकारायला पाहिजे. याबाबतीत ते लिहितात, "सर्व संप्रदायातील लोकांचा एकमेकांशी चांगला संबंध असायला हवा. त्यांनी दुसऱ्यांच्या शिकवणीला ऎकले पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाची अशी इच्छा आहे कि, इतर संप्रदायातील चांगल्या शिकवणीला सर्वांनी समजून घेतले पाहिजे " यावरून आपल्याला त्यांचा इतर संप्रदायाच्या आणि संप्रदायीक लोकांच्या प्रती असलेला दृष्टिकोन समजतो. ते सांप्रदायिक भेदभाव पाळणारे कोणत्याही प्रकारचे सांप्रदायिक नव्हते. तर सर्व जीव सुखी व्हावेत,त्यांच्यातील सर्व प्रकारची (सामाजिक/सांप्रदायिक) बंधने नष्ट व्हावीत व एक मानव जात म्हणून त्यांनी सदाचारी जीवन जगावे ह्या ध्येयाला पुढे करुन धर्मसचा प्रचार आणि प्रसार करणारे ते धार्मिक होते..
६. धर्मराज्यात अंधश्रध्दा - कर्मकांड यांचे नाही, तर धर्माचे अस्तित्व आहे..
आपल्या देशामध्ये सध्या आपल्या अनेक प्रकारच्या श्रध्दा अंधश्रध्दा बघायला मिळतात. ह्या केवळ आजच तयार झालेल्या नाहीत, तर फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. जसे समुद्राचा प्रवास करु नये, शुभ मुहूर्त पाहुनच मंगल कार्ये करावीत. इत्यादी अनेक प्रकारच्या अंधश्रध्दांचे अस्तित्व फार पूर्व काळापासून सुध्दा आपल्या समाजामध्ये होतेच. त्यांच्या ह्या अस्तित्वाला कदाचित अधर्माची शिकवणच कारणीभूत असावी. पण सम्राट प्रियदर्शी अशोकांचे साम्राज्य हे धर्मराज्य होते. ते आपल्या ससाम्राज्याचा कारभार धम्माप्रमाणे करित असल्याने, त्यांच्या राज्यात अशा अंधश्रध्दांवर प्रहार होणे निश्चितच होते. त्यासाठी ते लिहितात,
"देवांचा प्रिय प्रियदर्शी राजाचे म्हणणे अाहे की, लोक संकटात असतांना, पुत्र किंवा मुलीच्या जन्माच्या वेळी,लग्नप्रसंगी आणि याप्रकारच्या अन्य प्रसंगी शुभ किंवा अशुभ समयी पुष्कळ प्रकारच्या चांगल्या - वाईट कर्मांचे संपादन करतात. यावेळी स्त्रीया अनेक प्रकारचे शुद् व निरर्थक विधी करतात. मंगल कार्य अवश्य करावीत पण याप्रकारचे मंगल कार्य अल्पफळ देणारे असतात. धर्माच्या द्वारे केले जाणारे धर्मकार्य महाफलदायज असते. (धर्माचे मंगल कार्य म्हणजे दास आणि सेवक यांच्याशी योग्य व्यवहार, शास्त्यांचा आदर , प्राण्यांची अहिंसा, श्रमण किंवा ब्राह्मणांना दान, प्राण्यांच्या सोबत आत्मसंयमाचा व्यवहार,तथा याप्रकारचे अन्य मंगलकार्य केले जावे म्हणुन पिता पुत्र बंधू आणि स्वामी यांनी सांगावे कि, हे धम्ममंगल चांगले आहे, आणि ह्याला तोपर्यंत संपन्न करावे, जोपर्यंत लक्ष्याची पूर्ती होत नाही. याशिवाय दान देणे चांगले आहे,हे एक श्रेष्ठ कार्य अाहे. पण धम्मदाना सारखे दुसरे दान,उपकार किंवा अनुभव नाहीत..) याशिवाय अन्य पप्रकारच्या मंगल कार्यांनी कार्यसिद्धी होईल असे नाही. त्यांच्या आचरणाने कार्यसिद्धी होवो अथवा न होवो. ते पृथ्वीवरील लोकांसाठीच असते परंतु धर्ममंगल सदासर्वकाळ पुण्यकारकच असतो. जरी ह्या लोकी कार्यसिद्धी झाली नाही, तरी परलोकी मात्र बरीच फलप्राप्ती होते. आणि ह्या लोकांमध्ये त्यांची उद्देश पूर्ती झाली तर धर्ममंगल कार्यामुळे दुहेरी लाभ मिळू शकतो ह्या लोकी कार्यसिध्दी होते, तसेच परलोकी सुध्दा अनंत पुण्य प्राप्त होते. "
६. मनुष्यांच्या इतके प्राणी सुध्दा समान आहेत...
यावरून आपल्याला हि शिकवण मिळते कि, पुण्य प्राप्ती च्या इच्छेने निरनिराळ्या प्रकारचे पुण्य कर्म करून जास्त काही प्राप्त होणार नाही, जरी त्यापासून काही लाभ झाला तर तो अल्पकाळच राहिल. परंतुधर्माच्या अाचरणाद्वारे मिळणारे फळ हे महान असते. आपण बुध्दवंदना करित असतांना एएक गाथा म्हणतो,
राजा भवतु धम्मिको ।
अर्थात राजा धार्मिक होवो ह्या तारेच्या अर्थाप्रमाणे सम्राट अशोक हे धार्मिक होते. त्यांनी आपल्या राज्याचा कार्यभार हा धर्माप्रमाणेच चालविला. त्यामुळे ते जगातील एक यशस्वी सम्राट झाले. ते एक बोधीसत्त्व होते, त्यांच्या हृदयामध्ये मानवांसाठी नाही, तर सर्व जीवांसाठी मंगल मैत्री आणि महाकरुणा वसत होती. त्यांच्या राज्यात प्राण्यांना सुध्दा मनुष्यांच्या बरोबरीने सन्मान मिळत असे. फार पूर्वीपासून यज्ञामध्ये विविध प्रकारच्या पशूंचे बळी दिले जायचे, त्यांना सम्राट अशोकांनी थांबविले.
"हा धर्मलेख देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने लिहविला आहे. कोणत्याही प्राण्यांना ममारून हवन जरी नये. कारण देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाच्या दृष्टीने ह्या समाजात बरेच अनिष्ट प्रकार घडत असतात. तथापि असे काही समाज आहेत, ते देवांच्या पप्रिय राजाच्या दृष्टीने हितावह आहेत. पूर्वी प्रियदर्शी राजाच्या पाकशाळेत सुप बनविण्यासाठी हजारो प्राण्यांचे बळी दिले जायचे. परंतु आता हा धर्नकेख लिहविण्यात येत आहे, त्यावेळी सूप बनविण्यासाठी ककेवळ ३ च प्राणी मारल्या जात आहेत, एक हरिण आणि दोन मोर, त्यातही हरिण रोज मारल्या जात नाही. आता यापुढे एकाही राजाची इच्छा होत नाही., प्राणी देखील मारता येणार नाही. "
सम्राट अशोकांनी केवळ लेखच लिहिले नाहीत, तर त्याप्रमाणे उपक्रम सुध्दा राबविले आणि त्यांना यशस्वी सुद्धा करुन दाखविले. एका लेखातुन ते म्हणतात, "आज बरीच वर्षे झाली आहेत, शेकडो वर्षांच्या पासून प्राणी हत्या वाढर होत्या, नातेवाईक, श्रमण आणि ब्राह्मणांना वाईट वागणुन दिली जात होती. परंतु आज देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाच्या धर्मानुसार लोकांच्या वर्तणुकीमुळे युध्दात वाजविली जाणारी घंटा धर्मांततेची घोषणा म्हणून वाजविली जात आहे. लोकांना चिमान, हत्ती, दिव्य क्रांती रुपी देव इत्यादींचे देखावे बघण्यासाठी मिळावे म्हणून वाजविली जात आहे. देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने दिलेल्या धर्मशिक्षणाने असा परिणाम झाला की, शेकडो वर्षांत दिसून आले नव्हते, इतके प्राणीहत्येचे प्रमाण कमी झाले. तसेच प्राण्यांच्या सोबत अहिंसा, नातेवाईक, ब्राम्हण व श्रमण यांचा आदर सत्कार, माता पित्यांची व वयोवृध्दांची सेवा वाढलेली दिसत आहे. आई वडील व वयोवृध्दांची सेवा लोक अधिकाधिक करत आहेत. व यासमान इतर अनेक प्रकारांनी धर्माचरण वाढलेले दिसत आहे. "
याशिवाय मनुष्यांच्या सह सर्व प्राण्यांना सुध्दा आरोग्यसेवेचा लाभ घेता यावा यासाठी अनेक दवाखाने सुरु केले. एका लेखात ते लिहितात,
"देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाच्या राज्यात सर्वत्र तसेच त्याच्या शेजारी असलेल्या गोल, पांडव, सतियपुत्र,केरलपुत्र तथा तांब्रपर्णी तसेच यवंतवराजा अंतियो व त्याच्या शेजारी असलेल्या इतर राज्यांच्या राज्यात प्रियदर्शी राजाने दोन प्रकारच्या चिकित्सेची व्यवस्था केली अाहे. १. मनुष्यांच्या चिकित्सेची, २. प्राण्यांच्या चिकित्सेची. मनुष्य व जजनावरांच्या उपयोगी पडतील अशा आैषधी वनस्पती होत नाही, तिथे तिथे त्या बाहेरून आणुन लावलेल्या आहेत. आणि मुळ जिथे जिथे नाहीत, ते सगळीकडून आणुन लावलेल्या अाहेत. मानवांना व पशुंना उपयोगी पडतील त्यासाठी मार्गावर ठिकठिकाणी विहिरी खोदविल्या आहेत व वृक्ष लावलेले आहेत."
७. धर्मराजा यश आणि कीर्तीसाठी कार्य करीत नाहीत...
ह्या लोककल्याणकारी राजाने दवाखाने सुरु करुन त्यात केवळ वविविध प्रकारच्या आैषधांचाच पुरवठा केलेला नाही, तर मनुष्य व जनावरांच्या गरजा लक्षात घेता, त्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी वविहिरी खोदल्या ततसेच रस्त्याच्या ददुतर्फा वृक्षांची लागवड सुध्दा केली.. असे महान कल्याणकारी सम्राट जगामध्ये क्वचितच बघायला मिळतील पण सदर लेख त्यांची महनरा प्रदर्शित करण्यासाठी केला गेलेला खटाटोप नव्हे. कारण सम्राट अशोक हे बोधीसत्त्व होते. त्यांनी जे काही कार्य केले ते सर्व जीवांच्या हितासाठी व सुखासाठी. आणि असे करित असतांना, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या यशाची, कीर्तीची किंवा लाभाची इच्छा केली नव्हती.
याविषयावर ते लिहितात, "देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा यश किंवा किर्ती यांना सर्वश्रेष्ठ मानीत नाही. ते जे काही यश आणि किर्ती यांची अपेक्षा करतात ते फक्त याकरिता कि,वर्तमान आणि भविष्यातील लोकांनी देखील धर्मवाक्य लक्षपूर्वक ऎकावेत आणि त्याप्रमाणे वागण्याची इच्छा उत्पन्न व्हावी म्हणुन देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा जे काही कार्य करीत आहे, ते सर्व परलोकसाठी आहे. असे का...?अशाकरिता कि प्रत्येकाची शत्रुपासुन सुटका व्हावी आणि हा शत्रु म्हणजे आपण ज्याला पाप म्हणतो तो होय. हि गोष्ट सिध्द करणे लहान मोठ्यांना महान परिश्रम केल्याशिवाय, केवळ त्याच्या मागे लागल्याशिवाय , ह्या सर्व गोष्टींचा त्याग केल्याशिवाय करणे कठीण आहे."
हे सुध्दा वाचा :
- Get link
- X
- Other Apps

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा